30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा सलग १५ वा कसोटी विजय

ऑस्ट्रेलियाचा सलग १५ वा कसोटी विजय

पाकिस्तानचा ८९ धावांत खुर्दा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलग १५ वा पराभव आहे. गेल्या १५ सामन्यांत पाकिस्तानला साधा एक सामना देखील अनिर्णीत ठेवता आलेला किंवा जिंकता आलेला नाही.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव २७१ धावांत गुंडाळत कांगारूंनी ५ बाद २३३ धावा करत ही आघाडी ४४९ धावांपर्यंत पोहोचवली. पाकिस्तानला हे मोठे आव्हान झेपले नाही. त्यांनी दुस-या डावात ८९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात ४८७ धावा काढल्या होत्या. आपली शेवटची कसोटी मालिका खेळणा-या डेव्हिड वॉर्नरने १६४ धावांची दीडशतकी खेळी केली. मिचेल मार्शने ९० धावा ठोकल्या होत्या. पाकिस्तानकडून पदार्पण करणा-या अमर जमालने ६ विकेट्स घेतल्या होत्या.
याच्या प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने पहिल्या डावात २७१ धावा केल्या. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर शफिक ४२ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लियॉनने सर्वाधिक ३ तर स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दुस-या डावात २१६ धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी दुस-या डावात ५ बाद २३३ धावा करत आपला डाव घोषित केला. दुस-या डावात उस्मान ख्वाजाने ९० तर मार्शने ६३ धावा केल्या. स्मिथनेही ४५ धावा करून योगदान दिले.

पाकिस्तानसमोर विजयासाठी ४४९ धावांचे आव्हान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा दुसरा डाव ८९ धावांत संपुष्टात आला. कांगारूंकडून मिचेल स्टार आणि हेजलवूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर नॅथनने २ आणि कमिन्सने १ विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR