34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यसुदृढ आरोग्यासाठी नाकाऐवजी तोंडाने श्वास घेणे टाळा!

सुदृढ आरोग्यासाठी नाकाऐवजी तोंडाने श्वास घेणे टाळा!

१०० पैकी ६१ लोक घेतात तोंडाने श्वास तोंडाव्दारे ऑक्सिजनचा अयोग्य प्रवाह

नवी दिल्ली : सामान्यत: आपण प्रत्येकजण नाकाने श्वास घेत असतो. परंतू काही वेळा आपण तोंडाने देखील श्वास घेत असतो. आपल्यातील अनेक जण धावताना किंवा चढण चढताना तोंडाने श्वास घेतो. तेव्हा अनेकजण तोंडाने श्वास घेऊ नको असा सल्ला देताना आपण ऐकले असेल. नुकत्याच झालेल्या अभ्यासात ६१ टक्के लोकांनी सांगितले की ते तोंडाने श्वास घेतात. परंतू तोंडाने श्वास घेणे का चुकीचे आहे.

श्वास नलिका नाक आणि तोंडापासून सुरू होते आणि श्वसनलिका आणि नंतर फुफ्फुसांमध्ये जाते, शरीरात ऑक्सिजनचा योग्य प्रवाह राखण्यास श्वसन नलिका मदत करते. नाक आणि तोंड असे श्वास घेण्याचे दोन मार्ग मानले आहेत, परंतु नाकातून श्वास घेणे अधिक योग्य मानले जाते. याबाबत एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये नाकातून श्वास घेणे का आवश्यक आहे? यावर मत मांडण्यात आले आहे. या पाहणी अभ्यासात २० निरोगी तरुणांचा समावेश करण्यात आला होता आणि त्यांना विश्रांती घेताना, व्यायाम करताना फक्त नाकाने किंवा तोंडाने श्वास घेण्यास सांगितले होते. या संशोधनात प्रत्येक सत्रा दरम्यान लोकांचा रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि हृदयगती मोजण्यात आली. यावेळी जेव्हा लोक विश्रांती घेत असताना नाकातून श्वास घेतात तेव्हा त्यांचा रक्तदाब कमी राहतो आणि हार्ट रेटची वेळही सुधारली. विश्रांती दरम्यान, नाकातून श्वास घेताना मज्जासंस्था अधिक आरामदायक स्थितीत राहते असे आढळून आले.

नाकातून श्वास घेणे अधिक फायदेशीर
अमेरिकन जर्नल ऑफ फिजियोलॉजी, रेग्युलेटरी, इंटिग्रेटेड अँड कंपॅरेटिव्ह फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानूसार, श्वासोच्छवासाच्या पद्धतीचा तुमच्या रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवर खूप परिणाम होतो. तोंडाऐवजी नाकाने श्वास घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो असे या संशोधनात असे आढळून आले.

वर्कआऊट करताना राहा सावधान
जेव्हा लोक काही जड वस्तू उचलतात, पाय-या चढतात, धावतात किंवा कसरत करतात, त्यावेळी ते तोंडाद्वारे श्वास घेण्यास सुरुवात करतात, कारण त्या वेळी हृदयाची गती वाढून हृदयाचे ठोके वेगवान झालेले असतात, त्यामुळे तोंडातून श्वास घेणे सामान्य आहे. परंतु बहुतेक तज्ज्ञांचे मते या काळातही श्वास नाकातूनच घ्यावा. वर्कआऊट करताना नाकातून किंवा तोंडाने श्वास घेण्यामध्ये काही फरक पडला नाही असे अभ्यासात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR