21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeपरभणीप्रणव अ‍ॅग्रो फूड प्रोडक्टस उद्यम पुरस्काराने सन्मानित

प्रणव अ‍ॅग्रो फूड प्रोडक्टस उद्यम पुरस्काराने सन्मानित

पूर्णा : येथील युवा दांम्पत्याने प्रणव अ‍ॅग्रो फूड प्रोडक्टसच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारीची दखल घेवून छत्रपती संभाजीनगर येथील उद्यम इन्फो सोल्युशन प्रा.लि. ने प्रणव अ‍ॅग्रो फुडचे संचालक तुषार पाटील व प्रतिक्षा पाटील यांना उद्यम पुरस्कार प्रदान केला आहे. पाटील यांनी पूर्णेत जून २०२२ मध्ये प्रणव अ‍ॅग्रो फूड प्रोडक्टस या नावाने उद्योग सुरू केला.

पुणे येथील उद्योजक अनिरूद्ध देशमुख यांची प्रेरणा घेत काका डॉ. हरीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात या गृहउद्योगाच्या माध्यमातून हळद व मिरची पावडर तयार करण्याचे काम सुरू केले. परिसरातील शेतक-यांकडून बांधावर जावून कच्चा माल विकत घेत त्याचे पावडर घरीच तयार करून मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्यास सुरूवात केली. आजमितीस ५ टन पावडरची निमीर्ती केली जात आहे. त्याबद्दल उद्यम इन्फो सोल्युशनने दखल घेत उद्यम पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार मिळाल्याबदल त्यांच्या मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR