अझरबैजानचे विमान रशियाने पाडले?

मॉस्को : अझरबैजानहून रशियाला जाणारे प्रवासी विमान अकताऊ कझाकिस्तानजवळ कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर २९ जण बचावले. ही दुर्घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे प्रवासी विमान रशियन अँटी-एअरक्राफ्ट सिस्टमने खाली पाडले असावे असे प्राथमिक संकेत सूचित करत असल्याचा दावा एका अमेरिकेच्या अधिका-याने केला आहे.

अमेरिकेच्या एका अधिका-याने गुरुवारी सांगितले की हे संकेत असे दर्शवतात की रशियन सिस्टमने अझरबैजान एअरलाइन्सच्या जे२-८२४३ विमानावर हल्ला केला. त्यानंतर ते अकताऊ शहराजवळ क्रॅश झाले. अमेरिकेने बुधवारी कोसळलेल्या विमान दुर्घटना घटनेचे मूल्यांकन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विमान दुर्घटनेत ६७ पैकी किमान ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अझरबैजान, कझाकिस्तान आणि रशियाच्या अधिका-यांनी लोकांना विनंती केली आहे की, जोपर्यंत या दुर्घटनेचा तपास पूर्ण होत नाही; तोपर्यंत अपघाताबाबत कोणतेही अंदाज बांधू नका.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी आयोग स्थापन
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कझाकिस्तान, अझरबैजान आणि रशियातील प्रतिनिधींचा समावेश असलेला एक आयोग स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती कझाकिस्तानचे उपपंतप्रधान कानट बोजुम्बायेव यांनी दिली आहे. कझाक स्टेट मीडियाच्या माहितीनुसार, रशिया आणि अझरबैजानच्या एजन्सींना फॉरेन्सिक तपासणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

माहितीसाठी २ आठवडे लागणार
कझाकिस्तानमधील वृत्तसंस्था काझिनफॉर्मच्या वृत्तानुसार, क्रॅश साइटवर दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला. यामुळे अपघात नेमका कसा घडला? हे शोधण्यास मदत होईल. स्कॅनमध्ये सापडलेल्या ब्लॅक बॉक्सची माहिती घेण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतील, असे बोजुम्बायेव यांनी म्हटले आहे.

दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलला?
अझरबैजान एअरलाइन्सने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू येथून चेचन्याच्या दक्षिणेकडील रशियन प्रजासत्ताकची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. पण विमानाला अकताऊपासून सुमारे ३ किलोमीटर (१.८ मैल) अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यादरम्यान विमान कोसळले. ग्रोझनीमधील दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याचे वृत्त रशियन स्टेट मीडियाने दिले आहे.

विमान उड्डाणानंतर अडीच तासांनंतर कोसळले
फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाईटरॅडर२४ च्या माहितीनुसार, विमान बुधवारी सकाळी ७:५५ वाजता अझरबैजानमधील स्थानिक वेळेनुसार १०:५५ वाजता निघाले आणि ते सुमारे अडीच तासांनंतर क्रॅश झाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27

Latest news