22 C
Latur
Thursday, August 28, 2025
Homeराष्ट्रीयमुलींना वेश्या म्हणणा-या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले

मुलींना वेश्या म्हणणा-या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कथावाचक अनिरुद्धाचार्य आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असे म्हणात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता अनिरुद्धाचार्य यांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशा लोकांना गुरु म्हणणे थांबवले पाहिजे असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.

रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. बाबा रामदेव म्हणाले की सनातन धर्माचे गुरु किंवा संन्यासी ते आहेत ज्यांनी देशासाठी उद्योग, आरोग्य, शिक्षण यामध्ये योगदान दिले आहे. ज्याचे भारताला भारत बनवण्यात कोणतेही योगदान नाही, जो मूर्खपणे बोलत आहे तो सनातन धर्माचा गुरु असू शकत नाही. आपण अशा लोकांना गुरु म्हणवून घेणे बंद करायला पाहिजे. पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की जीवनात चारित्र्य, पवित्रता आणि पुरुषत्व असले पाहिजे. मात्र सनातन धर्माचे अनेक गुरु लोक उपदेशाच्या नावाखाली फसवणूक करतात.

धर्मग्रंथातील एका श्लोकावर बोलताना बाब म्हणाले की, उपदेश करण्यात ना तथ्य आहे, ना विज्ञान आहे ना सत्य आहे, त्यांनी आता अशा गोष्टी बोलणे बंद करायला हवे. अनिरुद्धाचार्य यांच्या मुलींच्या चारित्र्याबद्दल विधानावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाचे आचरण चांगले असले पाहिजे. कोणत्याही वर्गाला लक्ष्य करणे आणि अश्लील गोष्टींबद्दल बोलणे हे स्वत:च एक अश्लीलता आहे. कोणताही सुसंस्कृत माणूस अशाप्रकारचे विधान करु शकत नाही. सामान्य लोकांनीही अश्लील गोष्टींबद्दल बोलू नये. कोणावरही टीका करू नये. एखाद्याविषयी वाईट बोलणे खूप चुकीचे आहे.

अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य
अमेरिकेने भारतावर लादलेल्या करावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, देशातील उत्पादन वाढवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. दुस-या देशातून वस्तू आपल्या देशात येऊ नये यासाठी त्यांनी कर लादला आहे. मात्र अमेरिकेला आयातीशिवाय पर्याय नाही. कारण अमेरिकेत कामगारांचा पगार आणि कच्चा माल महाग आहे, त्यामुळे अमेरिका आपले उत्पादन वाढवू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR