28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रगरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी

गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी

गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गुरुदास बाबा फरार

अमरावती : भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणा-या अध्यात्मिक गुरुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतील जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात ही घटना घडली. मार्डी येथील आश्रमातील भोंदु गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे. तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा प्रसिद्ध झाला होता.

पीडित महिला भक्त ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे. या पीडित महिलेचा पती सध्या आजारी आहे. पती आजारातून बरे व्हावे यासाठी आरोपी भोंदू बाबाने पीडित महिलेला आश्रमात राहण्यास सांगितले होते. याच दरम्यान, महिलेचे गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरने बलात्कार केला. महिलेवर झालेल्या अत्याचाराची व्हिडीओ क्लिपही त्याने तयार केली. या व्हिडीओ क्लिपच्या आधारे तिचे शोषण करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने भोंदू बाबा विरोधात अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कु-हा पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला आहे.

तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वारकरी सांप्रदयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (५२ वर्षे) असे या नराधम महाराजाचे नाव आहे. दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेतात. सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. मग त्यानंतर तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR