35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रबाबरीची वीट राज ठाकरेंना भेट

बाबरीची वीट राज ठाकरेंना भेट

मुंबई : बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट सोबत आणली होती. ३२ वर्षे त्यांनी ती वीट जपून ठेवली. मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाळा नांदगावकर यांनी बाबरीची वीट दिली.

६ डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते, त्यामध्ये बाळा नांदगावकरही होते. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही एक वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती. त्यांनी दोन विटा आणल्या होत्या. एक त्यांच्या घरी आहे आणि ही एक वीट. या विटेचे वजन बघून समजेल किती मजबूत आहे. तेव्हाचे कन्स्ट्रक्शन चांगले होते कारण तेव्हा कंत्राटं निघत नव्हती. हा बाबरी मशीद पाडली त्याचा पुरावा आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात’
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘‘तो प्रसंग आठवला की, फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या. ३२ वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. २२ जानेवारीला राम मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि २३ तारखेला बाळासाहेबांचा जन्म दिवस आहे. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी बाबरीची वीट सोबत आणली होती. मी माजगावमध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालयाखाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवांकडे आहे, असो हरकत नाही, तो माझा जुना सहकारी आहे.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR