मुंबई : मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्य सरकारने शब्द पाळला नाही तर मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उभे राहणार असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू यांनी दिला. मनोज जरांगे यांनी दिलेली २४ तारीख जवळ येत आहे, १७ तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत असेही ते म्हणाले. सरकारने मनोज जरांगे यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या वेळी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करत आमदार बच्चू कडू म्हणाले की मी जरांगे यांना शब्द दिला आहे त्यामुळे मी शब्दांचा पक्का आहे, नाहीतर मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार.
आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करून जरांगे यांच्या आंदोलन थांबवले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मराठ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्या मागणीला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दिला आहे.