बीड : प्रतिनिधी
बजरंग सोनवणे हे भाजपला मॅनेज आहेत. खासदार सोनवणे यांनी मॅनेज होऊन केज मतदारसंघासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांवर उमेदवार दिले आहेत. यामुळेच केजमध्ये शरद पवारांची सभा झाली नाही; असा गंभीर आरोप मनसेचे सुमंत धस यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
केजमध्ये मनसेचे इंजिन धावणारच
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केज मतदारसंघाचे उमेदवार रमेश गालफाडे यांचे चिन्ह इंजिन असून ते केज मतदारसंघातून धावणारच आहे. जनतेला वेड्यात काढायचे काम या दोघांनी केले. त्यामुळे येणा-या काळात केज मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाल उधळेल; असा विश्वास देखील यावेळी मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्यासह सुमंत धस यांनी व्यक्त केला आहे.