अर्धवट विसर्जित दुर्गामूर्तींचे फोटो काढण्यावर बंदी

मुंबई : दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा विसर्जनाच्या वेळी पाण्यात तरंगणा-या किंवा अर्धवट विसर्जित झालेल्या (बुडालेल्या) दुर्गामूर्तींचे फोटो किंवा व्हीडीओ काढण्यास आणि व्हायरल करणा-यांवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी नव्याने लागू झालेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई शहरातील विविध तलाव, समुद्रकिनारे आणि जलाशयांमध्ये देवी दुर्गेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल.

या प्रक्रियेदरम्यान, समुद्रातील भरती-ओहोटीमुळे किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगत काही अर्धवट विरघळलेल्या मूर्ती पुन्हा किना-यावर येण्याची शक्यता असते. अशा वेळी बीएमसीचे कर्मचारी या मूर्ती पाण्याबाहेर काढण्याचे काम करतात.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा अर्धवट विसर्जित मूर्तींचे फोटो किंवा व्हीडीओ काढणे, ते सोशल मीडियावर व्हायरल करणे किंवा बीएमसी कर्मचा-यांनी त्या मूर्ती बाहेर काढतानाचे दृश्य शेअर केल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. यातून सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कृती टाळण्यासाठी तत्काळ खबरदारीची पावले उचलणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
00:00
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24

Latest news