ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेश सध्याच्या घडीला बस-ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प आहे. हिंसाचार वाढू नये, म्हणून सरकारने मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. शाळा, महाविद्यालयासह मदरसे अनिश्चितकाळासाठी बंद आहेत. संपूर्ण देशात सैन्य रस्त्यावर उतरले आहे. बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
आरक्षणविरोधात देशव्यापी आंदोलन अधिक प्रखर बनत चालले आहे. या आंदोलनामुळे बांग्लादेशच्या वेगवेगळ्या भागात आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला असून २५०० लोक जखमी झाले आहेत. विविध शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून अनेक शहरात लाठी, दांडे आणि दगड घेऊन आंदोलक रस्त्यावर फिरत आहेत.
मागच्या १५ दिवसांपासून हिंसक आंदोलनाने तिथल्या पोलीस, प्रशासन आणि संपूर्ण सत्तेला हादरवून सोडले आहे. बांगलादेशातील तरुण पोलीस बळ आणि कायदा दोन्ही मानायला तयार नाहीत. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून आवाहन केलं जात आहे. पण त्याचा काही परिणाम होत नाही. बांग्लादेशची राजधानी ढाका विरोधाचे मुख्य केंद्र बनली आहे. हिंसक आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली.
अशी आहे बांगलादेशातील आरक्षण व्यवस्था…
– बांगलादेशात स्वतंत्रता सेनानी म्हणजे मुक्ती योद्धाच्या मुलांना ३० टक्के आरक्षण.
– महिलांसाठी १० टक्के आरक्षण.
– वेगवेळ्या जिल्ह्यात १० टक्के आरक्षण निश्चित.
– जातीगत अल्पसंख्यकांसाठी ६ टक्के कोटा आहे. यात संथाल, पांखो, त्रिपुरी, चकमा आणि खासी या जाती आहेत.