20.5 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeक्रीडाबांगलादेश भारतात टी-२० विश्वचषक न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम

बांगलादेश भारतात टी-२० विश्वचषक न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम

खेळाडूंची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता

ढाका : पेसर मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्ड(बीसीबी) टी-२० विश्वचषकातील त्यांच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याच्या मागणीवर ठाम आहे. त्यांनी मंगळवारी आयसीसीसोबतच्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये पुन्हा एकदा आपली मागणी मांडली आहे. तर, आयसीसीने बांगलादेशी बोर्डाला या मागणीवर पुन्हा विचार करण्यास सांगितले आहे.

एक दिवसापूर्वी सोमवारी आयसीसीने बीसीबीची ठिकाण बदलण्याची मागणी फेटाळून लावली होती. बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारतात मुस्तफिजुरला विरोध झाला. बीसीसीआयने मुस्तफिजुरला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली नाही आणि ३ जानेवारी रोजी केकेआरने त्याला रिलीज केले.

यामुळे संतप्त झालेल्या बांगलादेशने आपल्या देशात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली. इतकेच नाही, तर धोक्याचा हवाला देत ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकात ठिकाण बदलण्याची मागणी करू लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR