ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेश संघाला पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी बांगलादेशचा संघ १३ ऑगस्टला पाकिस्तान दौ-यावर जाणार आहे. आज या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघात १६ खेळाडूंना स्थान मिळाले आहे. दरम्यान, अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनचे बांगलादेश कसोटी क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. तर नजमुल हसन शांतोला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
शाकिब अल हसनने मार्च २०२४ मध्ये बांगलादेशकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवले. तेव्हापासून, शाकिब फक्त टी-२० क्रिकेट खेळत आहे, टी-२० विश्वचषक ते यूएसएमधील मेजर लीग क्रिकेट आणि ग्लोबल टी-२० कॅनडा लीग पर्यंत. शकीबशिवाय मुशफिकुर रहीम आणि तस्किन अहमद यांनाही संघात संधी मिळाली आहे. तस्किन ३० ऑगस्टपासून सुरू होणारी दुसरी कसोटी खेळणार आहे.
बांगलादेश कसोटी संघ
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहीद राणा, शरीफुल इस्लाम , हसन महमूद, तस्किन अहमद आणि सय्यद खालिद अहमद.