यवतमाळ : यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विधानभवनाची पायरी चढणारे आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचल्या गेले आहे आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असा निर्वाणीचा इशारा बंजारा महंतांनी दिला आहे. दिग्रस दारव्हा नेर येथून मोठ्या संख्येने बंजारा समुदाय पदयात्रेद्वारे पोहरागडावर पोहोचले, याठिकाणी भोग अरदास करून संजय राठोड याना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घालण्यात आले.
संजय राठोड बंजारा व बहुजन समाजाचे नेतृत्व आहे, पोहरागडाचा त्यांनी प्रचंड विकास केला, त्यामुळे बंजारा समाज महायुतीच्या बाजूने राहिला मात्र तरीही त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत कारस्थान रचल्या जात असेल तर बंजारा समाज देशात पश्चाताप रैली काढून उत्तर देईल असा इशारा यावेळी महंत कबीरदास महाराज यांनी दिला.