39.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रबारामती कुणाचा सातबारा नाही..

बारामती कुणाचा सातबारा नाही..

विजय शिवतारे लोकसभेच्या रिंगणात

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणा-या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्यासंदर्भात त्यांनी सोमवारी घोषणाच केली.

शिवतारे म्हणाले की, पुरंदरच्या स्वाभिमानी जनतसेठी मोठमोठ्यांशी पंगा घेतला. एकच आपल्याला संदेश देतो. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई.. हेच चाललंय ना.. अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा काही कोणाचा सातबारा नाही, की सतत बारामतीचा ५० वर्ष खासदार पाहिजे. पुरंदर, इंदापूर भोरचा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा. काय मिळालं आम्हाला? विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी.. स्वाभिमानी जनतेचा अपमान केलाय.. तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणाले होते. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या निवडणुकीत त्यांना ६ लाख ८६ हजार मतदान झाले होते आणि ५ लाख ८० हजार मतदान पवार विरोधकांचे आहे. सहा लाखमध्ये दोन पवार आणि पाच लाखामध्ये एकटा विजय शिवतारे असेल. पुरंदर, भोर, इंदापूर आपल्या बाजूने असेल. ही लढाई आता आरपार लढायची असा मी निर्णय घेतला आहे, असे शिवतारे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR