बारामती : प्रतिनिधी
प्रत्येकाचा उमेदीचा काळ असतो. आतापर्यंत आम्ही सातत्याने वरिष्ठांचे ऐकत आलो आहोत. बारामतीकरांनो, आता फक्त माझे ऐका. माझे ऐकल्यास मी तुम्हाला असे काही करून दाखवितो की तुम्ही पाहातच राहाल. आतापर्यंत तुमचे भरभरून आशीर्वाद मिळाले. जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात, तोपर्यंत मी कुठेही कमी पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
बारामती येथे आयोजित नूतन सरपंच, उपसरपंच सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते बोलत होते. मी मागेही सांगितले आहे की, काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरू होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता, म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मी त्यांना काय दमदाटी केली का, भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा, असे अजित पवार म्हणाले.
आता इथून पुढे फक्त माझे ऐका बाकी कोणाचे एकू नका, असेही अजित पवार म्हणाले. इतके वर्ष बाकीच्यांचे खूप ऐकल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला असे काही करून दाखवतो, असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आतापर्यंत वरिष्ठांनी सांगेल. तसेच काम करत आल्याचे अजित पवार म्हणाले.
आता इकडे, तिकडे करू नका
तुम्ही मला आजपर्यंत भरभरून आशीर्वाद दिले. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. इकडे पण तिकडे पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे त्यांनी यावे, असे अजित पवार म्हणाले. मी जे काही करेल ते बारामतीकरांच्या हिताचेच घेईल, असे अजित पवार म्हणाले.