25.1 C
Latur
Wednesday, May 28, 2025
Homeसोलापूरबार्शीत धुवाँधार पावसामुळे बार्शी-तुळजापूर रस्ता बंद

बार्शीत धुवाँधार पावसामुळे बार्शी-तुळजापूर रस्ता बंद

वाहनांच्या २ किमी पर्यंत लांब रांगा शेतशिवारात पाणीच पाणी

बार्शी : रविवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बार्शी शहरासह तालुक्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतशिवारात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. बार्शी शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी तुळजापूर रोडवरील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पूर्णत: बंद झाला होता. त्यामुळे बार्शी तुळजापूर रोडवर दोन किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बार्शी तुळजापूर रस्त्यावरील अशोका हॉटेल येथून ते दर्शना ऑइलमिल पर्यंत वाहनांच्या रंगा लागल्या होत्या. दहा वाजता पर्यंत ही पाणी कमी न झाल्याने वाहनांच्या जवळपास दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बार्शी तालुक्यातील वैराग,कारी, नारी, मानेगाव, घाणेगाव, भालगांव, गौडगाव, रुईसह, इंदापूर, नारी, चिखर्डे, शेलगाव, तांदुळवाडी, मळेगावसह बार्शी शहरात दीड ते दोन तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतीवर पाणीच पाणी साचले आहे. बार्शी-तुळजापूर रोडवरील रेल्वे पुलाखालील पाणी दहा वाजता पर्यंत कमी झाले नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. हीच परिस्थिती तालुक्याच्या ग्रामीण भागातही झाली होती. साकत, वैराग व गौडगाव परिसरातील अनेक गावातील ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

रविवारी दुपारनंतर सूर्यदर्शन झाल्याने अनेकांना पाऊस उघडला असे वाटत असतानाच सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या संततधार पावसाने रेकॉर्ड ब्रेक विक्रम केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान दि. ३० मेपर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR