दिवाळीत मिठाई घेताना सावधान

मुंबई : आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे दुकानांमधून मिठाई आणि खवा विकला जात आहे. या काळात मोठया प्रमाणावर मिठाई आणि खव्याची विक्री होणार आहे. त्यापूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच मिठाई खरेदी करावी. दोन किंवा तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुकानात असलेली खवा मिठाई खरेदी करू नका. मिठाई किंवा खवा खरेदी करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

तुकाराम मुंढे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केले आहे. नामांकित आणि लेबल असलेली मिठाई आणि खवाच खरेदी करा, असे सांगतनाच जर काही संशयित किंवा भेसळ संदर्भात तक्रार असेल तर एफडीएला कळवा, आम्ही योग्य ती कारवाई करू, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. तसेच मिठाई आणि इतर मिठाई दुकान आस्थापनांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. जास्त कलर, भडक रंग असलेली मिठाई खरेदी करू नका. पाकिटावर मिठाई किंवा खव्याच्या निर्मितीची तारीख असेल तरच खरेदी करा. सोन्याच्या वर्ख, चांदीचा वर्ख असलेल्या मिठाई बाबत काळजी घ्या. चांदीचा वर्ख तपासूनच घ्या. वर्ख हातात घेतला आणि तो विरघळला तर तो योग्य. मात्र जर त्याची फॉईल बनत असेल तर तो अल्युमिनियम फॉईल आहे म्हणून समजायचे. त्यामुळे चांदी किंवा सोन्याचा वर्ख असलेली मिठाई घेताना काळजी घ्या, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29

Latest news