28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयदलित, ओबीसी व्होटबॅँकेमुळे भोलेबाबावर कारवाई अशक्य

दलित, ओबीसी व्होटबॅँकेमुळे भोलेबाबावर कारवाई अशक्य

हाथरस : वृत्तसंस्था
हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला एक आठवडा पुर्ण झाला. या संपूर्ण प्रकरणात एकीकडे पिडीत लोक बाबा भोलेनाथ उर्फ ​​सूरजपाल स्ािंग जाटव याला शिक्षा देण्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीनंतरही नारायण हरीचे लोकेशन ट्रेस होत नाही. उत्तर प्रदेशातील दलित, ओबीसी व्होट बॅँकेवर भोलेबाबाचा प्रभाव असल्यामुळे परिणामी राजकीय पक्ष कारवाईबाबत उत्सुकता दाखवित नाहीत, हे उल्लेखनिय ठरते.

वस्तुत: एखाद्या सत्संगात किंवा कोणत्याही मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात कोणतीही दुर्घटना झाल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातात कारण तो कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयोजकांची असते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांचीच असते. त्यामुळे भोलेबाबावर कारवाई होण्याची शक्यता दिसत नाही.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ८ जागांवर पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेशातील ३० जिल्हे आणि १३० हून अधिक विधानसभा जागांवर सूरज पाल स्ािंह याची चांगली पकड आहे.

२०१२ मध्ये भाजपला ५ टक्के जाटव आणि ११ टक्के गैर-जाटव मते मिळाली होती. त्याच वेळी, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ही मतांची टक्केवारी २१ टक्क्यांवर गेली. म्हणजे उत्तर प्रदेशात २१ टक्के जाटव समाजाने भाजपला मतदान केले तर ४१ टक्के गैर-जाटव मते भाजपला गेली. उत्तर प्रदेशात दलितांची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. येथील एकूण लोकसंख्येमध्ये दलितांचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे, ज्यामुळे त्याची एक महत्त्वाची व्होट बँक आहे.

बाबा स्वत: जाटव समाजातून आलेला आहे आणि त्याचे बहुतांश अनुयायी दलित आणि ओबीसी समाजातील आहेत. अशा परिस्थितीत कोणताही पक्ष त्यांच्या विरोधात बोलला तर पश्चिम उत्तर प्रदेशातील दलित व्होटबँकेला तडा जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR