22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरबीडचा सर्वांत शेवटी निकाल

बीडचा सर्वांत शेवटी निकाल

बीड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राज्यात सर्वात शेवटी बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाला लागणार आहे. त्यामुळे बीडकरांना विजयाचा जल्लोष करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव तालुक्यातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी केली जाणार आहे. माजलगाव शहरातील बुथ क्रमांक ६८ वरील मतमोजणी सगळ््यात शेवटी केली जाणार आहे.

मॉक पोलवेळी जे ५० मतदान केले होते, त्याच्या चिठ्ठ्या मिशनमधून बाहेर काढून टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने या मॉक मतदान केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बीडमध्ये एकूण ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात व ईव्हीएम मशिनवर आहेत. त्यामुळेही येथील मतमोजणीला विलंब लागणार आहे. येथील मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी झाली असती तर पाचव्या फेरीमध्ये माजलगाव शहरातील बुथ क्रमांक ६८ चे मतदान मोजले गेले असते. मात्र, आता हे मतदान सगळे मतदान मोजून झाल्यानंतर शेवटी मोजले जाणार आहे. त्यामुळे बीडमधील लोकसभा निवडणुकांचा निकाल सर्वात शेवटी लागू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR