हिंगोली : लोकसभेसाठी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांचे देवदर्शन सुरू झाले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी माकडाचे दर्शन घेतले. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वंचितचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी माकडाने हजेरी लावली. चव्हाण हे त्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होणार होते. त्यांचे कुटुंबीयांकडून औक्षण सुरू असतानाच अचानकपणे माकडाने त्यांच्या किचनमध्ये एन्ट्री केली. येथील खाद्यपदार्थांवर त्याने ताव मारला. बी. डी. चव्हाण यांनी त्याचे दर्शन घेतले. त्यानंतर ते अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.