17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीसाईबाबा नागरी बँकेला बेस्ट कॉऑपरेटीव्ह बँकेचा पुरस्कार

साईबाबा नागरी बँकेला बेस्ट कॉऑपरेटीव्ह बँकेचा पुरस्कार

सेलू : बँक टेक एक्स फॅक्टर द्वारा मुबंई येथे आयोजित देशातील पब्लिक सेक्टर बँक, प्रोव्हेट सेक्टर बँक, स्मॉल फायनान्स बँक या बँका सोबतच साईबाबा नागरीसह बँकेला बेस्ट कॉ ऑपेरेटिव्ह इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे इंडिपेन्डेन्स डायरेक्टर दीपक शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाडाने यांनी स्वीकारला. या वेळी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले की, या पुरस्कारात सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, कर्मचारी वृंद यांचा वाटा आहे. या पुरस्कारामुळे राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा बँकेचे नावलौकिक झाले असून आता कर्मचारी व बँकेचे संचालक यांची जवाबदारी वाढली आहे.

ग्राहक व सभासदांना अंत्यत सुरक्षित अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ग्राहकांसाठी विविध आधुनिक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या ३० वर्षापासून सेवा देत आहोत. ग्राहकांनी, सभासद यांनी जास्तीत जास्त एटीएम, पीओएस, इकॉम, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधाचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR