24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाबेथ मुनी करणार गुजरात संघाचे नेतृत्व

बेथ मुनी करणार गुजरात संघाचे नेतृत्व

मुंबई : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारीपासून बंगळुरूमध्ये रंगणार आहे. यावेळी लीगचे सामने दोन टप्प्यात खेळले जाणार आहेत. पहिला टप्पा बंगळुरू आणि दुसरा टप्पा दिल्लीत होईल.
महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये पाच संघांमध्ये एकूण २२सामने खेळले जातील. ही लीग सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात जायंट्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनी डब्ल्यूपीएलच्या दुस-या सत्रात गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व करणार आहे. तर भारतीय अष्टपैलू स्नेह राणा उपकर्णधार असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुनीची गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, दुखापतीमुळे तिला पहिल्या सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर स्नेह राणाने संपूर्ण हंगामात संघाचे नेतृत्व केले.

बेथ मुनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकणा-या ऑस्ट्रेलियन संघांचा भाग असण्याव्यतिरिक्त, ती २०२२ डऊक वर्ल्ड कप आणि २०२२ च्या बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघांमध्ये होती.
तसेच डिसेंबर २०१७ मध्ये तिने आयसीसी टी-२०प्लेयर ऑफ द इयर आणि इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर असे दोन्ही पुरस्कार जिंकले आहेत. महिला प्रीमियर लीगच्या दुस-या सत्रात गुजरात जायंट्स २५ फेब्रुवारीला बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

२०२४ साठी गुजरात जायंट्स संघ : अ‍ॅशले गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, त्रिशा पूजाता, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, कॅथरीन कृष्णा ब्रायस, मनीषा कश्मीर, तरन्नुम पठाण.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR