सोलापूर : नुकत्याच हैदराबाद मध्ये पार पडलेल्या 18 व्या वार्षिक अधिवेशनात सोलापूरच्या भावसार व्हिजन क्लब ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट क्लबचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये भावसार व्हिजन ने राबविलेल्या विविध 23 प्रकल्पांची दखल घेऊन चौथ्यादा हा बहुमान सोलापूरच्या भावसार व्हिजन ला देण्यात आला. या शिवाय नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे यांना फौंडर्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
या शिवाय एरिया 105 मधील बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट क्लब, बेस्ट कॅप्टन, बेस्ट वुमन वेल्फेअर, बेस्ट चाइल्ड वेल्फेअर,बेस्ट ट्रेझरर,बेस्ट व्हिजन सर्व्हिस, बेस्ट प्रोजेक्ट सर्व्हिस,बेस्ट बुलेटिन एडिटर, बेस्ट एक्स्ट्रा ऑर्डीनरी प्रोजेक्ट या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रणिता महिंद्रकर, मल्लिनाथ बासुतकर, गिरीश पुकाळे,मनोज क्षीरसागर, दीपक महिंद्रकर, विशाल खामित्कर , हर्षल माळवदकर, तेजस्विनी माळवदकर यांना पुरस्कार देण्यात आले. या अधिवेशनात सोलापूरच्या भावसार व्हिजन क्लबने दिंडी चे सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात डॉ अन्नदासम सुब्रमण्यम, सुभाष अग्रवाल, डॉ नागराज या नामवंत वक्त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. यात महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू,तेलंगणा,आंध्र प्रदेश ,गुजरात व मध्य प्रदेशातील जवळपास पाचशे भावसार व्हिजन सदस्य उपस्थित होते. या अधिवेशनासाठी सोलापुरातून पंचवीस भावसार सदस्य उपस्थित होते.