28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभिडेवाडा अखेर इतिहासजमा

भिडेवाडा अखेर इतिहासजमा

पुणे : प्रतिनिधी
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडेवाडा सोमवार, दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आला. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत असल्याने महापालिकेने रात्री अकरानंतर वाडा पाडण्याचा निणर्य घेतला. त्यानुसार रात्री पोलिस बंदोबस्तात वाडा पाडल्याने भिडेवाडा इतिहासजमा झाला. भिडे वाड्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला. त्यामुळे भिडेवाडा जमीनदोस्त करण्यात आला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. मात्र, १३ वर्षे हे प्रकरण न्यायालयात अडकले होते. या वाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. या स्मारकासाठी १३ वर्षे संघर्ष करावा लागला. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भिडेवाडा हा इतिहासजमा झाला आहे.

१३ वर्षांनी मनपाने जिंकली लढाई
फुले दापत्याने भिडेवाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे, यासाठी महापालिकेत ठराव झाला होता. ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होताच जागा मालक व भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल १३ वर्षानंतर महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केल्याने मार्ग मोकळा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR