लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ध्वनीप्रदूषणावर कडक कारवाई करत मंदिर आणि मस्जिदवरील लाऊड स्पीकर उतरवण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या र्त्यांच्या निर्देशानंतर पोलीस प्रशासनाकडून हे काम वेगाने करण्यात येत असून धार्मिक स्थळावरील लाऊड स्पीकर नियमांचे पालन होत नसल्यास ते उतरवण्यात येत आहेत. मंदिर असो वा मस्जीद, आरती असो किंवा अजान प्रशासन अधिक गंभीर बनले आहे. त्यानुसार, कारवाई सुरू असून आतापर्यंत ३२८८ लाऊड स्पीकर उतरवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारनेही मिशिदींवरील भोंगे उतवण्यास सुरुवात केली होती. ज्या मशिदीकडून डेसिबल आवाजाचे नियम पाळले जात नाहीत, त्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले होते. त्यावेळीही, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही तशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यावर, राज ठाकरेंनी पत्र लिहून यूपी सरकारचे कौतुक करत आभार मानले होते.
आता, योगी सरकारने पुन्हा एकदा भोंग्यावरील कारवाई सुरू केली असून कानपूरमध्ये अनेक मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. ज्या मिशिदींकडून कायदा पाळला जात नव्हता, नियम धाब्यावर बसवले जात होते. त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. तसेच, लखनौपासून जवळच असलेल्या बाराबंकी येथील मस्जिदच्या मिनारवर असलेले भोंगेही उतरवण्यात आले आहेत. पोलिसांकडून हे लाऊड स्पीकर काढण्यात येत असून एकत्रित जमा केले जात आहेत.