26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयभोजपुरी स्टार पवन सिंहची भाजपमधून हकालपट्टी

भोजपुरी स्टार पवन सिंहची भाजपमधून हकालपट्टी

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) भोजपुरी स्टार पवन सिंहवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने पवन सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पवन सिंह बिहारधील करकट लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहेत. पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी त्यांची आईही याच जागेवरून निवडणूक लढवत होती, मात्र अलीकडेच त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

बिहार भाजप मुख्यालयाचे प्रभारी अरविंद शर्मी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, तुम्ही लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध लढत आहात, त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन तुम्ही पक्षशिस्तीविरुद्ध काम केले आहे. अशा स्थितीत तुमच्या पक्षविरोधी कामामुळे मा. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. पवन सिंह यांची भाजपमधून हकालपट्टी करणारे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र हिंदी भाषेत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात १ जून रोजी करकट मतदारसंघात मतदान होणार आहे. सध्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या जागांवर बहुतांश पक्षांचे लक्ष आहे. येथे एनडीएने उपेंद्र कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून तिकिट न मिळाल्याने पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. तर महाआघाडीच्या वतीने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी-लेनिनवादी) राजा रामसिंग यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पवन सिंहमुळे भाजपची मते विभागली जाऊ शकतात. याचा फायदा महाआघाडीला होणार आहे. यामुळे भाजपने ही कारवाई केल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR