21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळ यांना क्लीन चिट नाही, दमानिया यांचा खुलासा

भुजबळ यांना क्लीन चिट नाही, दमानिया यांचा खुलासा

मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला. पण मनी लाँड्रिंगची कुठलीही केस ईडीने मागे घेतली नाही, असा दावा त्यांनी केला. मंत्री भुजबळ यांना या प्रकरणात कुठलीही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. ही याचिका मागे घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळांच्या राजकीय वादात आपल्याला पडायचे नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आपला लढा होता आणि तो मरेपर्यंत लढत राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तर ईडीने पण याचिका दाखल केल्या होत्या. २०१८ मध्ये ईडीने भुजबळ यांना परदेशात जाण्यास मनाई करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका ईडीने मागे घेतल्याच्या बातम्या आल्या. पण ही बातमी चुकीची असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले. ईडीने याचिका दाखल केली. त्याचवेळी भुजबळ हे परदेशात जाणून आले. ते परदेशात जाऊन आल्याने आता या दाव्याला अर्थ नसल्याचे मत कोर्टाने मांडले. त्यामुळे या प्रकरणात भुजबळांना दिलासा मिळाला होता.

पुढे बोलताना दमानिया यांनी भुजबळांच्या परदेश दौ-यावर खास टिप्पणी केली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण भुजबळांनी यानंतर परदेश दौरे केले. या प्रकरणात त्यांनी ईडी आणि भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याविषयी चुकीच्या बातम्या येत असल्याने ईडीने यासंबंधी खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. ईडीने भुजबळांविरोधात मनी लाँड्रिंगची केस बिलकूल मागे घेतलेली नाही असा दावा त्यांनी केला. तर भुजबळांनी काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगत, हे प्रकरण बंद झाल्याची प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र सदन केस प्रकरणातून माझी सुटका : भुजबळ
दमानिया यांना काहीतरी गैरसमज झालेला आहे. बातमी अतिशय चुकीची आलेली आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हणणे मांडले. दोन-तीन वर्षांपूर्वी परदेशात कामानिमित्त जायचे होते. तेव्हा आम्ही कोर्टाला परवानगी मागितली कोर्टाने परवानगी दिल्यानंतर दोनदा परदेशात जाऊन आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परदेशात जाण्याविरोधातील हे प्रकरण आपण विसरलो होतो. ईडी पण हे प्रकरण विसरल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने याचिकेला आता अर्थ उरला नसल्याचे मत मांडल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन केस प्रकरणातून आम्ही डिस्चार्ज झालो आहोत, आपली आता या आरोपातून सुटका झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिला. त्यांनी पवार यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार गट थेट सत्ता पक्षात सहभागी झाला. त्यावेळी छगन भुजबळ हे पण शरद पवार यांना सोडून या युतीत सहभागी झाले. भुजबळ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानण्यात येत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR