22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांनी ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे

भुजबळांनी ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाने राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तर, ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या आधी त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला आहे. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. पण, छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. आता यावर छगन भुजबळ काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR