25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
HomeUncategorized‘आप’ला मोठा धक्का; ३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर

‘आप’ला मोठा धक्का; ३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर

चंदीगड : चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीतील वाद शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप करून आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून , या प्रकरणावर १९ फेबु्ररवारीला सुनावणी होणार आहे. मात्र यापूर्वीच आपचे तीन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष आणि दोन महिला नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून, ते काही दिवसांत पक्षात प्रवेश करू शकतात, यामुळे आपला मोठा धक्का मानला जात आहे.

सुत्रांच्या मते, गुरुग्राममध्ये होणा-या भाजपच्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या उपस्थितीत हे तिन्ही नगरसेवक भाजपचे कमळ हाती घेणार आहेत असे सांगण्यात येत आहे.असे झाल्यास भाजपकडे १४ ऐवजी १७ नगरसेवक असतील, तर भाजप खासदाराचे एक मत पक्षाच्या खात्यात जाईल. शुक्रवारी रात्रीपासून आम आदमी पक्षाच्या दोन महिला नगरसेवक आणि अन्य एक जण शहराबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान , आपच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी दावा केला की,आपणाला एका नगर सेवकांनी लग्नाच्या कार्यक्रमासाठी जाण्याची चर्चा केली आहे. तर दुसरा नगरसेवक आपमध्येच राहणार आहे. मात्र, त्यानंतर त्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले.

३० जानेवारीला झाली होती महापौरपदाची निवडणूक
३० जानेवारी रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत प्रशासनाने नेमणूक केलेल्या पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी आठ आपच्या नगरसेवकांची मते अवैध ठरविले होते. यानंतर भाजपचे मनोज सोनकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. मात्र या निवडीला आपने न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडणूक अधिका-याचा हेराफेरी करतानाचा एक एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, तो सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या रेर्कार्डवर घेतला आहे.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला चांगलेच फटकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ फेब्रुवारीला होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR