बंगळुरू : एजीआयओ या भारतातील प्रीमअर फॅशन ई-टेलरतर्फे ‘बिग बोल्ड सेल’ या त्यांच्या फ्लॅगशीप इव्हेंटची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल पॉवर्ड बाय आदिदास आणि को-पॉवर्ड बाय सुपरड्राय असून ७ डिसेंबर २०२३पासून या सेलची सुरवात होणार आहे. ग्राहकांना ४ डिसेंबरपासून या सेलचा अर्ली ऍक्सेस उपलब्ध झाला होता. बिग बोल्ड सेलच्या या सर्वात मोठ्या आवृत्तीमध्ये ग्राहक ५५०० प्लस ब्रँड्सकडून सादर करण्यात आलेल्या १६ लाख निवड फॅशन स्टाइल्समधून निवड करण्याची संधी उपलब्ध आहे आणि त्यांना खरेदीचा अतुलनीय आनंद मिळणार आहे.
विशेष म्हणजे, भारतातील १९ हजार प्लस पिन कोडमधील ग्राहकांना एक्सक्लुझिव्ह आंतरराष्ट्रीय ब्रँड, मालकीची लेबल्स आणि स्थानिक ब्रँड्सच्या वैविध्यपूर्ण पर्यायांमधून निवड करता येणार आहे. या ब्रँड्सवर उत्तम डील्स उपलब्ध आहेत. फॅशन, लाइफस्टाइल, गृहोपयोगी व सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, सौंदर्य उत्पादने, वैयक्तिक निगा या कॅटेगरीतील उत्पादने खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी चालून आलेली आहे. तसेच आघाडीच्या ब्रँड्सवर ५० ते ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय क्रेडिट व डेबिट कार्ड वापरल्यास १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट प्राप्त होईल.
आदिदास, सुपरड्राय, नाइके, पुमा, गॅप, एसिक्स, यूएसपीए, न्यू बॅलेन्स, अंडर आर्मर, स्टीव्ह मॅडन, टॉमी हिलफिगर, डिझेल, कॅल्व्हिन क्लाइन, मायकेल कोर्स, बॉस, लिव्हाइस, मार्क्स अँड स्पेन्सर, अर्मानी एक्स्चेंज, रितु कुमार, मुजी, सॅम, बुडा जीन्स कं., फायर रोझ, पोर्टिको, कॅसिओ, लॅक्मे, मेबलीन आणि अशा अनेक ब्रँड्सवर चांगल्या डील्स उपलब्ध आहेत.
या बाबतीत अधिक माहिती देताना एजीआयओचे सीईओ विनीथ नायर म्हणाले, दर वर्षी ग्राहक बिग बोल्ड सेलची आतुरतेने वाट पाहत असतात. अर्ली ऍक्सेस सुरू झाल्यापासून आम्ही एजीआयओवर ऑर्डरच्या संख्येत ४० टक्यांची वाढ झालेली दिसून आली आहे. मोठमोठे ब्रँड आणि बोल्ड ऑफर्ससह या शॉंपिग सीझनमध्ये ग्राहकांना समाधानी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. श्रद्धा कपूर पुन्हा एकदा या कॅम्पेनमध्ये दिसणार आहे. या वेळी तिच्यासोबत तिचे वडील शक्ती कपूरही दिसणार आहेत.