22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमस्क यांच्याकडून ट्रम्प समर्थकांना मोठी देणगी

मस्क यांच्याकडून ट्रम्प समर्थकांना मोठी देणगी

वॉशिंग्टन : या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. अशातच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रकृतीबाबत डेमोक्रॅटिक पक्षात चिंता वाढत आहे. दुसरीकडे अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी त्यांच्या राजकीय गट ग्रेट अमेरिका पीएसीला मोठी रक्कम दान केली आहे. असा दावा ब्लूमबर्गच्या एका अहवालात करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, ब्लूमगर्ग समूहाने देणगीची रक्कम उघड केली नसली तरी, ती मोठी रक्कम असल्याचे म्हटले आहे. ग्रेट अमेरिका पीएसी १५ जुलै रोजी आपल्या देणगीदारांची यादी जाहीर करेल. २०१५ च्या अध्यक्षीय निवडणुकीतही या गटाने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. त्याची स्थापना त्याच वर्षी एरिक बीचने केली होती, एरिक एक राजकीय रणनीतीकार आणि अध्यक्षीय मोहिमेतील दिग्गज होता.

५ नोव्हेंबरला होणा-या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्चमध्ये ट्रम्प यांनी मस्क आणि इतर श्रीमंत देणगीदारांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मस्कने एक्यवर लिहिले होते की, मला स्पष्ट करायचे आहे की मी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कोणत्याही उमेदवाराला देणगी देणार नाही. दरम्यान आता ब्लूमगर्ग यांनी केलेल्या दाव्यामुळे मस्क ट्रम्पला मदत करत असल्याचे उघड झाले आहे. भाजला असून त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सासाराम सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR