मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने ६१ सामंजस्य करार केले आहेत. या करारांच्या माध्यमातून १५.७० लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून, तब्बल १६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर शिक्षण, वित्त, आटोमोबाइल, मीडिया, मेटल, हेवी इंडस्ट्रिज याचा समावेश असून या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते दावोसमधून बोलत होते.
राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. एमएमआरमध्ये असेल, विदर्भात ५ लाख कोटींचे एमओयू आले आहेत. मराठवाडा शक्तिस्थळ म्हणून उदयास येत आहे. ९८ टक्के ग्रोथ एफडीआय स्वरूपात आहे. या गुंतवणुकीमुळे मोठी रोजगार निर्मिती होईल. सर्वाधिक करार करण्यात आपण पहिल्या क्रमांकावर आहे. दावोस दौ-यात वेगवेगळ््या टेक्नॉलॉजी शिकायला मिळाल्या. महाराष्ट्राची शक्ती काय आहे, ती मांडण्याची संधी मिळाली. तसेच वेगवेगळ््या देशातील प्रतिनिधींसोबत संवाद साधला. भारत म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडता आली. राज्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करता आल्या, असेही फडणवीसांनी सांगितले. दावोसमध्ये झालेल्या करारात देश-विदेशी गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दावोसमध्ये एकाच विदेशी कंपनीशी करार
महाराष्ट्र सरकारने दावोस येथे ज्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. यातील एक कंपनी परदेशातील असून उर्वरित २८ कंपन्या भारतीय आहेत. २८ पैकी २० कंपन्या महाराष्ट्रातील असताना गुंतवणुकीचे सामंजस्य करार दावोसला करण्याची गरज काय, असा सवाल करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौ-यावर टीकास्त्र सोडले आहे. दावोसमध्ेय महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मात्र, या दाव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली.