23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयएअर इंडियाच्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा

एअर इंडियाच्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा

नवी दिल्ली : विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. आता एअर इंडियाच्या विमानात एक विचित्र घटना घडली आहे. प्रवाशाच्या जेवणात चक्क ब्लेडचा तुकडा सापडला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरिअन्स ऑफिसर राजेश डोग्रा यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आणि चूक मान्य केली.

राजेश डोगरा म्हणाले, आमच्या एका फ्लाइटमधील प्रवाशाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळला. तपासणीनंतर समजले की, हा तुकडा भाजीपाला कापण्यासाठी वापरल्या जाणा-या मशीनचा आहे. या घटनेनंतर आम्ही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

न शिजवलेले अन्न दिल्याचा प्रवाशाचा आरोप
यापूर्वी एअर इंडियाच्या नवी दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइटच्या बिझनेस क्लासमधील एका प्रवाशाने कंपनीवर न शिजवलेले अन्न दिल्याचा आरोप केला आहे. त्याने एक्सवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. तर, दुस-या एका घटनेत प्रवाशाने फ्लाइटमधील ३५ पैकी किमान ५ सीट बसण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले. पण, अद्याप कंपनीकडून याबाबत कुठलीही प्रतक्रिया आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR