30 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeराष्ट्रीयरामलीला मैदानावर काँग्रेसची मोठी रॅली

रामलीला मैदानावर काँग्रेसची मोठी रॅली

नवी दिल्ली : काँग्रेस दिल्लीत आम आदमी पक्षासोबत लोकसभा निवडणूक लढवण्याचा तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात जागांवर तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष ३ फेब्रुवारीला दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठी रॅली घेऊन लोकसभा निवडणुकीची सुरुवात करणार आहे. काँग्रेसचे बडे नेते या या सभेला संबोधित करणार आहेत.

काँग्रेसने या जाहीर सभेला न्याय संमेलन असे नाव देऊन राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. या न्याय संमेलनाच्या माध्यमातून युवक, महिला, गरीब, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष काम करणार आहे. काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली म्हणाले की, लोकसभेच्या सातही जागांवर बैठका झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवली यांनी सांगितले की, काँग्रेस दिल्लीतील रामलीला मैदानावर ३ फेब्रुवारीला न्याय संकल्प संमेलनाच्या नावाने कार्यकर्ता परिषद आयोजित करणार आहे.

यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व बडे नेते संबोधित करू शकतात. दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युती करण्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली म्हणाले की, जागा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पण चंदीगड प्रकरण पाहता दिल्लीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या परस्पर बैठकीनंतर जागांची संख्या आणि जागा निवडीचा निर्णय होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR