24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीयेसेगाव पाटी जवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

येसेगाव पाटी जवळील अपघातात दुचाकीस्वार ठार

जिंतूर : जिंतूर परभणी महामार्गावरील पांगरी जवळील येसेगाव पाटी जवळ छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली आहे. जिंतूर- परभणी महामार्ग रस्त्यावरील पांगरी जवळील येसेगाव पाटी जवळ दुचाकीस्वार एकनाथ मारोतराव राऊत (वय ३०) रा.दुधगाव ता.जिंतूर हे दुचाकी वाहन क्रमांक एम एच २२ ऐ जे ७२७३ या दुचाकीवरून परभणीकडे जात होते. याच वेळी परभणीहुन जिंतूरकडे येणारा छोटा हत्ती क्रमांक एम एच ३० ऐ व्ही ०९९१ याच्या सोबत दुचाकीची धडक झाली.

या अपघातात दुचाकीस्वार एकनाथ राऊत यास डोक्याला, पायावर गंभीर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेला असताना त्यास सामाजिक कार्यकर्ते नागेश आकांत व पोलीस कर्मचा-यांनी खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक शेख सोहल याच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ.गजानन काळे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. अपघातात मृत्यू पावलेल्या राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. या घटने बाबत जिंतूर पोलिसात बातमी देईपर्यंत कोणती नोंद झालेली नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR