22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयओमानचे सुलतान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा

ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक शुक्रवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आले. दरम्यान, ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चा झाली असून परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या चर्चेबाबत माहिती दिली आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ओमानच्या सुलतानशी चर्चा पूर्ण केली. उपपंतप्रधान, सात कॅबिनेट मंत्री आणि उपमंत्री यांच्या शिष्टमंडळासह ते भारत दौऱ्यावर आहेत. ओमानच्या सुलतानांची गेल्या २६ वर्षांतील ही पहिलीच भारत भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानच्या सुलतानशी संवाद साधला. यादरम्यान, सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि सुरक्षा या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ओमानचे सुलतान शुक्रवारी दिल्लीत पोहचले. त्यांचा हा पहिलाच भारतीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानच्या सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, २६ वर्षांनंतर ओमानच्या एखाद्या सुलतानांनी भारताला भेट दिली, हा दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. सर्व भारतीयांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. ‘दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय, सुरक्षा, संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा झाली. इस्रायल-हमास युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सुलतान हैथम बिन तारिक यांनी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावर्षी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन ओमानच्या दौऱ्यावर गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR