18 C
Latur
Thursday, December 19, 2024
Homeसोलापूरआळजापूर ग्रामपंचायततर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती

आळजापूर ग्रामपंचायततर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती

बार्शी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय आळजापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती कार्यक्रमासाठी होते. सरपंच मोनिका गहिनीनाथ घुगे उपसरपंच बाबासाहेब भाऊराव वडवे ग्रामसेवक दादासाहेब कराड रोजगार सेवक राजभाऊ उंबरे, कोतवाल हरिभाऊ वडवे, यांच्यासह विकी दादा मित्र मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी देशभरात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जात असून स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक, समाजसुधारक होते, ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. एकविसाव्या शतकातही स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा तरुणांवर आणि सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव आजही आहे. त्यांच्या विचारांमुळे अनेकांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व बदलले आहे. आजही कोट्यवधी तरुण विवेकानंदांना आपला आदर्श मानतात त्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली ओळख असल्याचे सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR