बार्शी : तालुक्यातील उपळे दु. येथील वखारिया विद्यालय येथे राजमाता जिजाऊ माँ. साहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख . डी . डी . राऊत व श्रीमती आर. एम .बुरगुटे यांनी राजमाता जिजाऊ साहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यपक डी. एस. रेवडकर , आर. आर. लंकेश्वर, एन. एन. महाले, व्ही . व्ही. शिंदे, ए. आर. वैद्य, एस. के. शिंदे, डी. बी . धनके, सुरवसे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यपक रेवडकर यांनी विद्यार्थ्यांना भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस होय. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून . स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील यासाठीच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे सांगत राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच छत्रपती स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करु शकल्याचे सांगितले.