चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात मंगळवारी सकाळी छोटा मटका नावाने ओळखल्या जाणा-या वाघाची एका नवीन वाघाची झुंज झाली. यामध्ये छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुस-या वाघाला ठार केले आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही झुंज झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
रामदेगी हा परिसर छोटा मटका या वाघाचा इलाका म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात नवीन वाघ आला होता. छोटा मटकाने त्याला ठार करून या इलाख्यात कोणीच येऊ शकत नसल्याचे सिद्ध केले आहे. या घटनेची माहिती होताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करीत आहे.