नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील उरणमधील यशश्री शिंदे या २२ वर्षीय युवतीच्या हत्येवरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांनी उरणमध्ये पीडित मुलीच्या घरी जाऊन भेट दिली. ही हत्या लव्ह जिहादमधूनच झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या घटनेवरून लव्ह जिहाद, लेन जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ही घटना वेदनादायी असल्याचे सांगितले. यशश्री शिंदे या युवतीच्या हत्या कशी झाली, याचा तांत्रिक मुद्यांच्या आधारे उलगडा केला आहे. घटनेतील आरोपी कसा पळून गेला हे देखील माहीत आहे. गुन्ह्यातील आरोपी स्थानिक नसून तो कर्नाटकचा आहे.
गुन्ह्यातील आरोपाला फाशीची शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. नुसते मोर्चा काढून होणार आहे. आपल्या मुलींना वाचवण्यासाठी पुढाकार आपणच घेतला पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: या घटनेवर लक्ष ठेवून आहे. पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
माजी खासदार नेते किरीट सोमय्या यांनी हा प्रकार लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला. राज्यात वेगाने लव्ह जिहाद, लेन जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढत असल्याचे सांगितले. आमदार नीतेश राणे यांनी राज्यात लव्ह जिहाद असल्याचा हा पुरावा आहे. उरणमधील माझ्या बहिणीने धर्मांतर केले नाही म्हणून ही अवस्थता केली. त्या जिहाद्याला जी काही शिक्षा द्यायची आहे, त्यासाठी आमचे हिंदुत्ववादी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोठेही कमी पडणार नाही, असा ठाम विश्वास नीतेश राणे यांनी दिला.
पीडितेच्या वडिलांचा दाऊदवर हल्ला
यशश्री शिंदे या युवतीची हत्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. पीडितेचे दाऊद शेख हिच्याशी प्रेमसंबंध होते. पीडितेच्या वडिलांनी या दाऊद शेखवर २०१९ मध्ये हल्ला देखील केला असल्याचे समजते. याला पोलिसांकडून दुजोरा मिळतोय. यशश्री शिंदेला दाऊद शेख गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता.
दाऊद शेखवर पोस्कोचा गुन्हा
हे दोघे २०१९ मध्ये एका कंपनीत कामाला होते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री होती. यातूनच पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेख याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दाऊद शेखविरोधात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटकात गेला. त्यानंतर देखील दाऊद आणि यशश्री संपर्कात होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे.