31.5 C
Latur
Tuesday, February 18, 2025
Homeराष्ट्रीयभाजपने नियुक्त केले २३ निवडणूक प्रभारी

भाजपने नियुक्त केले २३ निवडणूक प्रभारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २३ निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. भाजप हायकमांडने उत्तर प्रदेशचे नवे प्रभारी म्हणून बैजयंत पांडा यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय विनोद तावडे यांची बिहारच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंगल पांडे यांना पश्चिम बंगालचे निवडणूक प्रभारी तर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महेंद्र सिंह यांची मध्य प्रदेशचे लोकसभा निवडणूक प्रभारी आणि सतीश उपाध्याय यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुष्यंत कुमार गौतम यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आली आहे. केरळसाठी प्रकाश जावडेकर यांना लोकसभा निवडणुकीचे प्रभारी, तर कर्नाटकसाठी राधामोहन दास अग्रवाल यांना प्रभारी आणि सुधाकर रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हरियाणासाठी विप्लव कुमार देव यांची प्रभारी आणि सुरेंद्र नागर यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR