30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयभाजपने फोडला निवडणुकीचा नारळ, जाहीर केले घोषणावाक्य

भाजपने फोडला निवडणुकीचा नारळ, जाहीर केले घोषणावाक्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचे विशेष निवडणूक घोषवाक्यही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे २०१४ पासूनचे निवडणूक घोषणावाक्य चर्चेत राहिले आहे. २०१४ मध्ये ‘मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है’ असे घोषणावाक्य होते. त्यानंतर २०१९ मध्ये ‘एक बार फिर मोदी सरकार’ असे घोषणावाक्य होते. आता २०२४ च्या निवडणूक प्रचारासाठी खास घोषवाक्य तयार केले आहे. ‘सपने नहीं हकीकत को बुनते हैं-तभी तो सब मोदी को चुनते है’। असा नारा पक्षाने दिला आहे. हे घोषणा जनतेतूनच आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. लोकांच्या भावना समजून घेत हे घोषणावाक्य स्वीकारले असल्याचं पक्षाने म्हटले आहे.

नवीन मतदारांसोबत मोदींचा संवाद
नवमतदारासोबत पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. यादरम्यान त्यांनी एक विशेष व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी भारतीय लोकांची स्वप्ने कशी प्रत्यक्षात आणली हे सांगितले आहे. भाजपचा असा विश्वास आहे की पक्षाचे निवडणूक घोषवाक्य केवळ काही लोकांच्या नाही तर मोठ्या लोकसंख्येच्या भावनांशी जोडलेले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना हे अभियान संपूर्ण देशातील जनतेपर्यंत नेण्याचे आवाहन केले आहे.

विविध टप्प्यात होणार प्रचार
भाजप वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार करणार आहे. या मोहिमेतील मुख्य गाणे आज रिलीज झाले आहे. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल होर्डिंग्ज, डिस्प्ले बॅनर आणि डिजिटल फिल्म्सच्या माध्यमातून प्रचार केला जाणर आहे. भाजपने यासाठी जोरदार नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी दिलेली आश्वासने कशी पूर्ण केली आहेत आणि कशी पुढे पूर्ण करणार आहेत यावर प्रचार केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR