22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeराष्ट्रीयभाजपला राजस्थानमध्ये बंडखोरांची भीती

भाजपला राजस्थानमध्ये बंडखोरांची भीती

जयपुर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता पक्षाला बंडखोर उमेदवारांची भीती आहे. राज्याच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय असलेले अनेक बडे नेते सध्या पक्षाशी बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

या स्थितीत भाजपला काँग्रेसपेक्षा आपल्याच बंडखोर उमेदवारांची भीती जास्त आहे, त्यांच्यामुळे भाजपचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये सोमवारी (६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्जा दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्याचबरोबर भाजपच्या अनेक दिग्गजांनी अनेक जागांवर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

तसेच बस्सी येथून जितेंद्र मीणा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते संघटन मंत्री चंद्रशेखर यांचे समर्थक मानले जातात. पिलानी येथून मागील निवडणूक लढवलेले कैलाश मेघवाल यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते राजेंद्र राठोड गटातील मानले जातात.

झुंझुनू येथून भाजपच्या तिकिटावर मागील निवडणूक लढवलेले राजेंद्र भांबू यांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते वसुंधरा राजे गटातील असल्याचे सांगितले जाते. दुगचे माजी आमदार रामचंद्र सुनारीवाल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ते भाजपच्या एका बड्या नेत्याच्या जवळचे असल्याचे बोलले जाते.

किसान मोर्चाचे राज्यमंत्री रामावतार यांनी बमनवासमधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. गंगापूर शहरातून दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माळी सैनी समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सीएल सैनी यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. ही अशी नावे आहेत, जी निवडणूक जिंकू शकत नाहीत, पण भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा खेळ बिघडू शकतात.

अडचणी निर्माण करू शकतात
कोटामधून भवानी सिंह राजावत, माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल, माजी मंत्री युनूस खान, माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत यांच्यासह अनेक दिग्गजांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्षाच्या निर्णयाविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. असे मानले जाते की, हे असे चेहरे आहेत जे निवडणूक जिंकू शकत नाहीत परंतु समाजातील त्यांच्या ताकतीमुळे भाजप उमेदवारासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR