बोरी : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रात व राज्यात सर्वसामान्य घटकातील विविध जाती धर्माचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा पक्ष देशात आघाडीवर आहे. केंद्रात व राज्यात विविध योजना राबवून सर्व सामान्याचे हित जोपासण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. सर्व सामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबध्द आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टीत सदस्य नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यमंत्री बोर्डीकर यांनी केले. बोरी येथे भाजप सदस्य नोंदणीच्या बोरी बस स्थानकावर दि. ५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री बोर्डीकर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर वाघीकर, भाजप महिला आघाडी अध्यक्ष डॉ.विद्या चौधरी, तालुकाध्यक्ष गोविंदराव थिटे, हभप राहुल महाराज राजूरकर, हभप गुलाब महाराज देशमुख व गावातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती. पुढे बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, बोरी येथील नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिले. या संधीचे मी नक्की सोने करेल.
जनतेला टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असो सांगितले. सूत्रसंचालन दिनकर चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत चौधरी, संभाजी चौधरी, ओमकार चौधरी, विकास खरात, अमृतराव चौधरी, सुधाकर संगेकर, वामन शिंपले, शेख वसीमभाई, मुंजा कंठाळे, शेख मतीन, गणेश बुलबुले, मुसवीर खा पठाण, अंबादास गजमल, भाऊ देशमुख, राम चव्हाण, शेख जावेद, अनिल चैन, शिवाजी कदम, अंगद कदम, रमेश बोर्डीकर, रावसाहेब शिंपले, गंगाधर शिंपले, लीलाताई अंभुरे, शितलताई चौधरी, शिवगंगा शिंपले, वर्षाताई चौधरी, पूजाताई शिंपले, पुनम संगेकर, संगीता अंकुशे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.