22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरभाजपच्या आमदार, खासदारांना सोलापूरच्या विकासाबाबत प्रचंड अनास्था

भाजपच्या आमदार, खासदारांना सोलापूरच्या विकासाबाबत प्रचंड अनास्था

सोलापूर : सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी विधानसभेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कालखंडात सुरू झालेली उद्योग भवन योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात 15 ठिकाणी उद्योग भवन उभारणार असल्याचे घोषित करण्यात आले. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे सुमारे एक डझन आमदार -खासदार माजी मंत्री पालकमंत्री असे लोकप्रतिनिधी असतानाही पहिल्या यादीत सोलापूर येथे उदयोग भावन अगर कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, ही अत्यंत निंदयनीय बाब आहे. वास्तविक महाविकास आघाडीचे तात्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना मी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करत होते . त्यावेळी युवा सेना प्रमुख माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी जिल्हा नियोजन समितीच्या समितीच्या बैठकीमध्ये सोलापुरात पर्यटन भवन व उद्योग भवन उभारण्याची मागणी आपण केली होती,

त्याविषयी तात्कालीन पालकमंत्री……… यानी त्यास प्रोत्साहन देऊन उद्योग भवन व पर्यटन भवन उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले होते, परंतु दरम्यानच्या काळात महायुतीचे बिघाडी सरकार राज्यात आले. त्यानंतर स्थानिक सत्ताधारी लोक प्रतिनिधीनी याविषयी पाठपुरावा करणे आवश्यक होता परंतु भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच याकडे आनास्था दाखवली आहे. त्यामुळे सोलापुरात कोणतेही नावीन्यपूर्ण उद्योग उभारले जात नाहीत, उद्योग निर्मिती साठी कसलाही प्रयत्न केला जात नाही, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे ,गिरण गाव म्हणून सोलापूर ची असलेली ओळख पुसून गेली आहे..आणखीनच सोलापूर बकाल होत चालले आहे,

जिल्ह्यातील अनेक युवक, बेरोजगार असल्याने व्यसनाधीन होत आहेत , ‘ब्रेनड्रेन’ मोठ्या प्रमाणात होत आहे रोजगाराच्या नव्या वाटा शोधत युवा युवा पिढी परप्रांतात, परदेशात वास्तव्याला कायमस्वरूपी जाताना दिसत आहेत. या शिवाय युवापिढीत बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्तता अधिक वाढत आहे, यातूनच कायदा व सुव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. या सर्व बाबीकडे भाजपाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार खासदार मात्र मूग गिळून गप्प असल्याचे जाणवते. त्यांना सोलापूरच्या विकासासाठी कसलेही सोयर सुतक नसल्याचे दिसून येते. यासाठी आपण लवकरच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR