20.1 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची ३७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई

भाजपची ३७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचारसभांचा धडाका सुरू असताना भाजपकडून मोठी अ‍ॅक्शन घेण्यात आली. भाजपकडून ३७ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पक्षाने सांगितल्यानंतरही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपकडून बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.

भाजपकडून याविषयी नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले. भाजपच्या काही पदाधिका-यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. त्यामुळे तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.

भाजपने ज्या बंडखोरांवर कारवाई केली ते पुढीलप्रमाणे…
शंकर मडावी, ब्रिजभूषण पाझारे, वसंत वरजुकर, राजू गायकवाड, एहतेशाम अली, भाविक भगत, नटवरलाल अंतवल, वैशाली देशमुख, मिल्ािंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, सतीश घाटगे, अशोक पांगारकर, सुरेश सोनवणे, एकनाथ जाधव, कुणाल सूर्यवंशी, आकाश साळुंखे, जयश्री गरुड, हरिष भगत, वरुण पाटील, गोपाळ जव्हेरी, धर्मेंद्र ठाकूर, दिलीप विठ्ठल भोईर, बाळासाहेब मरकुटे, शोभा बनशेट्टी, सुनिल बंडकर, विशाल परब.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR