22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा?

कल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा?

महायुतीत धुसफूस सुरूच शिंदेंचे टेन्शन वाढणार?

कल्याण : प्रतिनिधी
कल्याण लोकसभा निवडणुकीचा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप कार्यकत्यांनी पत्राद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षीय ताकद पाहता तसेच, या मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांचे संख्याबळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या खासदारांसाठी पोषक असे वातावरण आहे. दिवा शहरातील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एकमुखाने हीच मागणी आहे. कल्याण लोकसभेसाठी उमेदवाराने कमळ चिन्हावरच लढावे, अशा प्रकारचे पत्र लिहून बावनकुळे यांना सचिन रमेश भोईर, दिवा भाजप मंडळाध्यक्ष यांनी विनंती केली आहे.

कल्याण लोकसभेची जागा महायुतीने शिवसेनेला सोडली आहे. प्रत्यक्षात कल्याण लोकसभा ही जागा अधिकृत जाहीर करण्यात आली नाही. मात्र, आगामी निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा निवडणूक शिसेनेच्या धनुष्यबाणावर लढवणार आहेत.

भारतीय जनता पार्टीने अनेकवेळा कल्याण लोकसभेवर दावा केला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कल्याण लोकसभेत दौरे केले. त्यामुळे भाजप सेनेत अनेकदा खटके उडाले आहेत. भाजप सेनेचा अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पुन्हा निवडणूक जाहीर होताच, भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेवर दावा केल्याने पुन्हा एकदा भाजप सेनेची धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार की कमळ?
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. तरी येणा-या निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार की कमळ? याची उत्सुकता कल्याण लोकसभेत राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR