15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपचा एकमेव अजेंडा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे

भाजपचा एकमेव अजेंडा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे

सतेज पाटलांनी थेट मुद्यावरच ठेठेवले बोट

कोल्हापूर : कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला मिळालेल्या जागेवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिंदे शिवसेनेला इचलकरंजीत मताधिक्य मिळून देखील ते कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाहीत. काँग्रेसने किमान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. स्वत: शिंदे सेना असो किंवा अजित पवार राष्ट्रवादी गट असो भाजपचा एकमेव अजेंडा यांना संपवणे, त्याची प्रचिती आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

कोल्हापुरात ते बोलत होते. कृपाशंकर सिंग यांच्यावरून बोलताना, भाजपचे नेहमीच दुटप्पी भूमिका दिसून आली आहे. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी एका नेत्याने एक वक्तव्य करायचे. दुसरा नेत्याने त्याचे खंडन करायचे. मीडिया स्पेस स्वत:कडे राहील. दोन्ही घटकांना फायदा करून आपल्याला निवडणुकीत याचा वापर करता येतं का हे भाजप नेहमी पाहत. मराठा समाज आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल यामध्ये सरकारचा प्लॅन एकाने एका बाजूने बोलायचं दुस-याने दुस-या बाजूने बोलायचे. दोन्ही घटक मतदान करताना आपल्यालाच मतदान करतील याचा प्रयत्न करतात. पण मुंबईमध्ये याचा फार फरक पडणार नाही मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होईल, असा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

कोल्हापूर कसे तुम्ही म्हणशीला तसा, हा माझा डेव्हलपमेंट प्लॅन आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी आम्ही मोहीम हातात घेतले आहे. कोल्हापूरकरांनी सांगा व त्यांच्या मनातील भावना काय आहेत. प्रशासकाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेवर सरकारची सत्ता आहे, या तीन वर्षात काय झाले? कोल्हापूरची धूळधाण काय झाली हे कोल्हापूरची जनता बघत आहे. आम्ही पॉझिटिव्ह अँगलने घेत आहोत. ते टीका करतायेत काही हरकत नाही. पण आम्ही पॉझिटिव्ह अँगलने पुढची पंधरा दिवस आम्ही घेऊन जाणार आहोत असे सतेज पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR