27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकल्याणात भाजपच्या सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कल्याणात भाजपच्या सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डोंबिवली : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी गुरूवारी (दि.२४) रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रंिवद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

गणपत गायकवाड यांच्या प्रती येथील जनतेचा असलेला विश्वास, त्यांनी केलेली कामे आणि सुलभा गायकवाड यांनी वाढवलेला जनसंपर्क यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतीत, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रंिवद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

राज्यातील महायुतीच्या माध्यमातून १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. ह्यात्पूर्वी तिसाई हाऊस ते ‘ड’ प्रभाग कार्यालयादरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत मंत्री रंिवद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, भाजपा नेते विनोद तावडे, आमदार कुमार आयलाणी, दलीत मित्र अण्णा रोकडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह जवळपास ८ हजारांहून अधिक महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR